शूटिंगदरम्यान डाकूंनी संजूबाबाच्या अपहरणाचा केला होता प्रयत्न, वाचा सविस्तर…

1726

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची चित्रपटांमधील कारकीर्द आणि सामान्य जीवन नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. सुपरस्टारच्या घरी जन्म, तरुण वयात लागलेली व्यसनं, त्यानंतर तुरुंगवास, फॅमिली ड्रामा असा बराच मसाला त्याच्या जीवनात आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. आता संजय दत्त एका नवीन कारणामुळे चर्चेत आला आहे.

संजय दत्त याचा ‘प्रस्थानम’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटामध्ये त्याने बाहुबली नेते बलदेव प्रताप सिंह यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता आणि तिथे त्याने अनेक खुलासे केले. शोमध्ये संजय दत्त याने एक जुना किस्सा सांगितले. एकेकाळी डाकूंनी माझ्या अपहरणाचाही प्रयत्न केला होता असे संजूबाबा म्हणाला.

शोदरम्यान कपिलने संजय दत्तला विचारले की, ‘मुझे जीने दो’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डाकूंनी तुझ्या अपहरणाचा प्रयत्न केला होता अशी अफवा आहे, काय आहे सत्य? याला उत्तर देताना संजूबाबा म्हणाला की, हे खरं आहे. मी लहान असताना रुपा डाकू याच्या गँगने माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्याने शूटिंग सुरू असताना मला कडेवर उचलून घेतले आणि वडिलांना विचारले की चित्रपटासाठी आतापर्यंत किती खर्च आला आहे. वडिलांनी सांगितले, 15 लाख रुपये. यानंतर रुपा डाकूने मी याचे अपहरण केले तर किती रुपये देशील? असे विचारले. या घटनेनंतर वडिलांनी आणि आईने मला मुंबईमध्ये माघारी पाठवले होते, अशी आठवण संजूबाबाने सांगितली.

आपली प्रतिक्रिया द्या