अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकर यांचा दावा

970

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त येत्या 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात (रासप)मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. संजय दत्त यांचा याच महिन्यात पक्षात प्रवेश होणार होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नसल्याचे जानकर यांनी सांगितलं.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जानकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या