वीर सावरकरांचा सन्मान करा, इथे तडजोड नाही; संजय राऊत यांचे तडक उत्तर

3874
sanjay-raut-press-conferenc

वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे दैवत आहेत. सावरकर या नावातच राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांचा आदर करतो. तुम्हीही सावरकर यांच्यासारख्या दैवताचा अपमान करू नका, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्या ‘ माझे राहुल सावरकर नाही,मी माफी मागणार नाही’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो, तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, जय हिंद’ असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या