संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टीपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला होता आणि लेखी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार विशेष सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी ईडीच्या वतीने ऍड. आशीष चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केले, तर संजय राऊत यांच्या वतीने ऍड. विक्रांत साबणे यांनी बाजू मांडली.