
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राज्यापालांवर कारवाई होत नसल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केलं. ‘राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल. शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यापालांना आधी ‘कारे’ करा, अशा असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
19 तारखे पाऊस हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधक तयार आहेत, विरोधक काय करतील ते तुम्ही पाहाच, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत होते की आम्ही कर्नाटकच्या ‘अरे’ ला ‘कारे’ करू मात्र हा शुद्ध नेभळटपणा आहे. आधी राजभवनात घुसून त्यांचा चहा न पता, बिस्किटं न खातराज्यपालांना ‘कारे’ छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करता हे विचारा. आधी कारे इथे विचारा, मग बाकीचं काय असेल ते करा. रोज छत्रपतींचा अपमान करता, बदनामी करता, हे भयंकर आहे. भारतीय जनता पक्षालाही उत्तर द्यावं लागेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
…यावरून भाजपचं किती स्थान आहे हे कळतं!
गुजरात निवडणुकीसंदर्भात बोलताना, ‘मधल्या काळात प्रधानमंत्र्यांनी त्यांचा बराचसा वेळ गुजरातला दिला आहे. तसेच प्रधानमंत्री हे तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान म्हणून सुद्धा मोठा कालखंड त्यांनी गुजरातला दिला आहे. ही दुसरी टर्म आहे तरी हे गुजरात निवडणूका जिंकण्यासाठी पंतप्रधानांना बाजी लावावी लागली यावरून भारतीय जनता पक्षाचे किती स्थान आहे हे स्पष्ट होत असल्याचा टोलाही त्यांनी लगाला.
गुजरात निवडणूकीवर वोटींग सुरु आहे तुम्हाला काय वाटतं काय निकाल येईल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर खरं म्हणजे कोणत्याही प्रचाराशिवाय ती निवडणूक त्यांनी जिंकायला हवी होती. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा अशा तऱ्हेनं गुजरातमध्ये त्यांनी प्रचार केला. तरी मी काय निकाल काय लागतोय सांगू शकत नाही, असंही ते म्हणाले.
गुजरात निवडणुकांची आपण वाट पाहू!
लोकं अस म्हणतात की, निवडणूक यंत्रणेवरती आमचा विश्वास नाही म्हणजे सरकारच्या विरुद्ध लोकभावना असली तरी तेच जिंकतील असं सांगितलं जात आहे. पण मी म्हणतो ही लोकशाही आहे असं होणार नाही. मशीन गडबड करून किती करणार ही लोकांची भावना आहे मी नाही सांगत त्याच्यामुळे आपण वाट पाहूया, असंही त्यांनी सांगितलं.
…तरच आघाडी घट्ट होते
‘राजकीय पक्षांचा बैठका होतच असतात. अशा बैठका झाल्याच पाहिजेत. बैठका झाल्या तरच आघाडी घट्ट होते’, अशी भूमिका त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीसंदर्भात स्पष्ट केली.
































































