सरन्यायाधीशांवरील हल्लेखोर हा भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश बीआर गवई यांच्यावरप आज सुनावणीदरम्यान एका वकिलाने बूट फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ”सरन्यायाधीशांवरील हल्लेखोर हा भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती आहे’, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले आहे.

”सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा डॉ आंबेडकर आणि संविधानावरील थेट हल्ला आहे! हल्लेखोर बेगडी हिंदुत्ववादी आहेत व भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.