
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोकणात येण्याचे आव्हान देणाऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे लवकर कोकणात येतील, दाखवा अडवून, असे आव्हान त्यांनी दिले. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
आधी तुम्हाला धूळ चारणाऱ्या वैभव नाईक यांचे आव्हान स्वीकारा, मग उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याची भाषा करा. उद्धव ठाकरे लवकरच कोकणात येतील. कोकणी जनतेचे प्रेमाचे निमंत्रण आहे. दाखवा अडवून, असे आव्हान राऊत यांनी दिले.
View this post on Instagram

























































