संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा 20 ऑक्टोंबर 2020 पासून सुरू झाल्या होत्या. मात्र, 20 ऑक्टोंबर रोजी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे 21 ऑक्टोंबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण अद्यापही दूर झालेली नसल्यामुळे 4 आणि 15 ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकातील 22 ऑक्टोंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याबाबतचे परिपत्रक परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

परीक्षेच्या अनुषंगाने लवकरच पुढील सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागातर्फे काढण्यात येणार आहे. 22 ऑक्टोंबर 2020 पासून होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या आहेत. याची नोंद सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावी, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या