Satara News – प्रदूषण नियंत्रणासाठी 11 संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक उत्सव आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये साऱ्यांनाच सहभागी करून घेणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर 11 संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, फलटण मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, खटाव तालुका ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कराड तालुका बांधकाम दक्षिण कार्यकारी अभियंता अमर नलवडे, वाई तालुका पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, महाबळेश्वर तालुका कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, पाटण तालुका प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, खंडाळा तालुका ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता गौरव चक्के, कोरेगाव तालुका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, माण तालुका जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग भिंगारदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा

n पालक अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून गावामध्ये घरगुती गणेश विसर्जनादिवशी व्यक्तीशः उपस्थित राहून गणपती मूर्तींचे कृत्रिम तळ्यामध्ये, वापर नसलेल्या विहिरीमध्ये, बंद असलेल्या खाणीमध्ये विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत निर्माल्य संकलनासाठी ट्रॉलीची व्यवस्था करावी. संकलित केलेले निर्माल्य कंपोस्ट खड्डय़ात खतनिर्मितीसाठी टाकावे.