
सातारा जिल्हावासीयांनी कोरोनाच्या दुसऱया इनिंगचा धसका घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास 15 शाळांमधील 49 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यामुळे पालककर्ग धास्तावला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावधानतेच्या उपाययोजना करून शाळांची घंटा वाजली खरी; पण आता 15 शाळांमध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच शाळांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.
कोरोनाचा काढता संसर्ग पाहाता पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी केली आहे. मास्क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. त्याचवेळी शाळांमध्ये कोरोनाने प्रवेश केल्याने धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्यानंतर स्थानिक शालेय शिक्षण समिती क पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार सर्व नियम व अटींचे पालन करत शाळा सुरू झाल्या. त्यानुसार सध्या जिल्ह्यातील शाळा सकाळ, दुपार सत्रांत सुरू असून, विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकूण 830 शाळा असून, त्यापैकी जवळपास 800 शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये जवळपास 55 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आता विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने धास्ती वाढली आहे. जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये 16 विद्यार्थी, तर नववी ते बारावीच्या शाळांमध्ये 33 विद्यार्थी असे एकूण 49 विद्यार्थी बाधित आढळले आहेत.






























































