
सामना प्रतिनिधी । लीडस्
हिंदुस्थानच्या सौरव कोठारीने जागतिक बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करीत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. त्याने जेतेपदाच्या लढतीत सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा पराभव करीत अजिंक्यपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. सौरव कोठारीला गेल्या दोन स्पर्धांमध्ये निराशेचा सामना करावा लागला होता. 2016 सालामध्ये बंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत त्याला पीटर गिलख्रिस्टकडून पराभूत व्हावे लागले होते.



























































