JNU Violence – दिल्ली हायकोर्टाची गूगल, फेसबुकला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनयु हिंसाचाराप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने ऍप्पल, गूगल आणि व्हॉट्सऍपला नोटीस जारी केली आहे. 5 जानेवारी रोजी विद्यापीठात हिंसाचार उफाळला होता. त्या दिवशीचा सर्व डेटा सुरक्षित ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. विद्यापीठाच्या तीन शिक्षकांनी हा डेटा सुरक्षित करण्याची मागणी केली होती.

दिली हायकोर्टाने तीन शिक्षकांच्या याचिकेवर सुनावणी केली. पाच जानेवारी रोजी विद्यापीठात हिंसाचार भडकला. त्या दिवशी जे जे व्हिडीओ रेकॉर्ड झाले ते संरक्षित करण्याची मागणी या शिक्षकांनी केली होती. तसेच दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसाठी विद्यापीठाकडे संपर्क साधला होता, परंतु विद्यापीठाने काहीच प्रतिक्रिया न दिल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

हायकोर्टाने ऍप्पल आणि व्हॉट्सऍपला सांगितले की की त्या दिवशी जे चॅट झाले ते सर्व संरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या माहितीवरून हिंसाचाराबाबत माहिती मिळेल तसेच याबाबत सर्व व्हिडीओ आणि रेकॉर्डिंग संरक्षित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.