
देशातील सर्वात बलाढ्य सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयकडून आपल्या 30 हजार कर्मचाऱ्य़ासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणली जाणार आहे. यातून बँकेच्या खर्चात कपात होऊन बचत वाढणार आहे.
‘सेकंड इनिग्ज टॉप व्हीआरएस-2020′ असे या योजनेचे आहे. बँकेच्या नियामक मंडळाच्या मंजुरीनंतर योजना लागू होणार आहे. सध्या स्टेट बँकेच्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्या 2.49लाख आहे.गेल्यावर्षी मार्च अखेरपर्यंत हि संख्या 2.57 लाख होती.यापूर्वी 2001 मध्ये स्टेट बँकेने स्वेच्छानिवृत्ती योजना आणली होती.
काय आहे योजना आणि पात्रतेचे निकष
- स्टेट बँकेचे 11565 अधिकारी आणि 18625 कर्मचारी असे 30190 जण या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत.
- या कर्मचाऱ्य़ानी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर बँकेची 2170 कोटी रुपयांची बचत होईल.
- ज्यांची बँकेत 25 वर्षांची नोकरी झाली आहे किंवा ज्या कर्मचाऱ्य़ाचे वय 55 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना व्हीआरएस घेता येईल.
- 1 डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येईल.
- स्वेच्छानिवृत्ती घेताना कर्मचाऱ्य़ाला नौकरीच्या राहिलेल्या वर्षांसाठी 50 टक्के सानुग्रह अनुदान मिळेल.
- ग्रेच्युइटी, पेन्शन, पीएफ आणि मेडिकल सुविधांचा लाभ मिळेल.

























































