आता घरी बसूनच बँकेतून पैसे मागवा! एसबीआयची ग्राहकांसाठी डोअर स्टेप सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

 

आपल्या बँक खात्यावरील पैसे रोखीने हवे असतील तर ग्राहकांना आता बँकेत किंवा एटीएममध्ये जावे लागणार नाही. करण एसबीआयने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांना घरपोच रोखीने पैसे देण्यासाठी डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे. त्या माध्यमातून संबंधित ग्राहक घरी बसून पह्न कॉलद्वारे रिक्वेस्ट करून घरी पैसे मागवू शकणार आहेत.

एसबीआय घरपोच पैसे देण्याबरोबरच धनादेश घेणे, धनादेश देणे, 15 एच फॉर्म स्वीकारणे आदी सेवा ग्राहकाच्या घरी जाऊन देणार आहे. दरम्यान, घरपोच पैसे मागवणारा ग्राहक आपल्या होम बॅंचच्या पाच किलोमीटर परिसरात वास्तव्याला असणे आवश्यक आहे. तसेच केवळ बँक सुरू असलेल्या दिवशी सकाळी 9 ते 4 या वेळेत ग्राहकाला घरपोच पैसे मागवण्याची रिक्वेस्ट 1800111103 या क्रमांकावर कॉल करून दाखल करावी लागणार आहे. दरम्यान, घरपोच पैसे देण्याची सेवा सध्या मोजक्याच शाखांमधून दिली जात असून त्यासाठी संबंधिताला 100 रुपये शुल्क आणि जीएसटी मोजावा लागणार आहे. बँकेतील ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी एसबीआयने ही सेवा सुरू केली आहे.