
जम्मू कश्मीर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथे येणारे पर्यटक दाल सरोवराला आवर्जून भेट देतात. दाल सरोवरातील हाऊसबोटही पर्यटकांना आकर्षित करतात. आता दाल सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणखी एक पर्वणी मिळाली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने दाल सरोवरात देशातील पहिले तरंगते एटीएम सुरू केले आहे.
एसबीआयने देशातील पहिले तरंगते एटीएम श्रीनगरमधील दाल सरोवरात सुरू केले आहे. हे तरंगते एटीएम पर्यटकांप्रमाणेच स्थानिकांमध्येही लोकप्रिय होत आहे. पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सोयीसाठी हे तरंगते एटीएम सुरू केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. हे एटीएम पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
एसबीआयने ट्विट करून देशातील या पहिल्या तंरगत्या एटीएमबाबत माहिती दिली. पर्यटकांची आणि स्थानिकांची नकदी नोटांची गरज भागवण्यासाठी या एटीएमचा उपयोग होणार आहे. हे एटीएम दाल सरोवरातील एका हाऊसबोटमध्ये हे तरंगते एटीएम सुरू करण्यात आले आहे. एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार यांच्याहस्ते या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्याहस्ते तंगमर्गमध्येही बँकेच्या एका शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
दाल सरोवरात सुरू करण्यात आलेले हे एटीएम पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. दाल सरोवरातील हाऊसबोट, शिकारासह हे एटीएमदेखील पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे या दाल सरोवरातच देशातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफीसही आहे. येथे येणारे पर्यटक या पोस्ट ऑफीसलाही भेट देतात.




























































