वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

1579
supreme-court-of-india

पितृक संपत्तीच्या वाटणीवरून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान वाटा असतो असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. मुलं लग्नापर्यंत आपलं कर्तव्य बजावतात पण मुली लग्न करून परक्या घरी जाऊनही आपले कर्तव्य पार पाडतात असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायलयाने 2005 च्या वारसाहक्क कायद्याची व्याख्या केली आहे. या कायद्याच्या दुरुस्तीपूर्वीही वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीला वडिलांच्या संपत्तीत मुलांइतकाच हक्क होता. त्यानंतर प्रश्न असा होता की 2005 पूर्वी एखाद्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला तर मुलीला संपत्तीत वाटा मिळणार का. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या