स्कूल बस महागणार

नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्कूलबस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. फीच्या दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

दरवर्षी इंधन दरवाढ आणि इतर कारणांमुळे स्कूलबस मालक स्कूलबस फीवाढीची घोषणा करतात. यंदादेखील 1 एप्रिलपासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूलबसेसची फी वाढविण्यात येणार आहे. पेंद्र सरकारने नवे व्रॅपिंग धोरण आखले आहे. त्याचा फटका स्कूल बसचालकांना बसणार आहे. त्याशिवाय बसगाडय़ांच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ, वाहनांचे स्पेअर पार्ट्स, टायर आणि बॅटरीच्या दरातदेखील 12 ते 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बसचा एकूण देखभालीचा खर्च वाढला असून वाहतूककाsंडीमुळे इंधनाच्या खर्चातदेखील वाढ झाली असल्याने स्कूलबस ओनर्स असोसिएशनने फीवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना महासाथीच्या काळात दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने स्कूल बसगाडय़ा वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. बस वाहतूक सेवा ठप्प असल्याने देखभाल खर्च वाढला होता. एका बाजूला कोणतेही उत्पन्न नसताना दुसरीकडे बसच्या देखभालीचा आर्थिक भार बस मालकांना सहन करावा लागत होता. अशातच आता बसेसवर काम करणारे चालक आणि वाहक याच्या पगारातही वाढ झाली आहे. हा सर्व खर्च पालकांकडून मिळणाऱया फीच्या पैशातून भागवला जाणारा आहे.

 राज्यात 44 ते 45 हजार स्कूलबस धावतात.

 मुंबईत साडेआठ हजारांच्या घरात स्कूलबसेस आहेत.

 घरापासून शालेपर्यंतचे प्रतिकिलोमीटर अंतरानुसार फी ठरविण्यात येते.

 सध्या स्कूलबसची फी किमान 1500 रुपये एवढी आहे.