
हरयाणातील हिसारमध्ये एका शाळेत शिक्षिकेने चौथीच्या वर्गातील विद्यार्थीनीच्या तोंडाला काळे फासून तिची धिंड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिसारमधील लक्ष्मी कॉनव्हेंट शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी शाळेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी शाळेविरोधात आंदोलन करत विद्यार्थ्यांना अशा प्रकारची वागणूक देणाऱी शाळा तत्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे.
Haryana: School girl’s face blackened by teacher, family stages protest and demands action
Read @ANI Story| https://t.co/v4akUF0smJ pic.twitter.com/Oi6xTXTNiH
— ANI Digital (@ani_digital) December 10, 2019
‘माझ्या मुलीला 6 डिसेंबरला झालेल्या एका परिक्षेत कमी गुण मिळाले. त्यामुळे तिच्या वर्गशिक्षिकेने तिच्या तोंडाला काळे फासून तिची शाळेतील सर्व वर्गातून धिंड काढली. तिला उत्तरं येत नव्हती त्यात काय मोठा गुन्हा होता. त्यांनी माझ्या मुलीसोबत आणखी दोन तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासल्याचे मला समजते. त्यांनी असे नको करायला हवे होते’, असे त्या मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले. ‘या प्रकरणी आम्ही शाळेविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांवर लवकरात लवकर कडक कारवाई करू’, असे सब्जी मंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी जगजित सिंग यांनी सांगितले.
























































