विद्यार्थीनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला, फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

आंध्र प्रदेशमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त जमावाने शिक्षकाला नागडा करत मारहाण केली आणि धिंड काढली. रामबाबू असे या 38 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे.

गोदावरी जिल्ह्यातील इलूरू येथील एका शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या रामबाबू या शिक्षकाने 10 वीच्या वर्गातील विद्यार्थीनावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिली. आपले बिंग फुटू नये म्हणून शिक्षकाने तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्या खायला दिल्या. गोळ्या खाल्ल्याने विद्यार्थीनीला त्रास होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. ही माहिती कुटुंबीयांना कळाली तेव्हा त्यांनी शाळेत येऊन शिक्षकाला झापले आणि कपडे फाटेपर्यंत मारले व धिंड काळली. या नंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थीनींना चांगल्या मार्कांचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. यात 10 वीची एक विद्यार्थीनी गर्भवती राहिली आणि त्याचे बिंग फुटले. दरम्यान पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.