
फीवाढीसह अनेक मुद्द्यांवरून प्रदर्शन करणारे दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा विद्यापाठी परिसरातून बाहेर आयोजित केल्याने नाराज असल्याने विद्यार्थी मंगळवारी रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थी आणि दिल्ली पोलीस आमनेसामने आल्याने मोठी कठिण परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये रस्त्यावर मोठा राडा झाला.
विद्यार्थ्यांनी फीवाढ आणि दीक्षांत सोहळा बाहेर आयोजित केल्याच्या विरोधात विद्यापीठ ते वसंत कुंज येथील कार्यक्रम स्थळापर्यंत मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सतर्क होते. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. दीक्षांत सोहळााच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अन्य मंत्री उपस्थित राहणार असल्याने दुपारी बारा वाजता पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा बोलावून घेतला आणि विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थी आणि पोलीस एकमेकांशी भिडले. यावेळी दोन बॅरिकेटची तोडफोड करण्यात आली.
#WATCH Delhi: Women police personnel push back girl students of JNU as the protest by Jawaharlal Nehru Students’ Union (JNUSU), over different issues including fee hike, continues outside the university campus. pic.twitter.com/FahM7wi8VV
— ANI (@ANI) November 11, 2019
आंदोलनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आयसा, एआयएसएफ आमि एसएफआय या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत फी कमी होत नाही तोपर्यंत दीक्षांत सोहळा होऊ देणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
#WATCH Delhi: A scuffle between the police and protesting students breaks out, as the protest organised by Jawaharlal Nehru Students’ Union (JNUSU) over different issues including fee hike, continues outside the university campus. pic.twitter.com/yOlezY9Rjx
— ANI (@ANI) November 11, 2019
दरम्यान, जेएनयूच्या ‘गोल्डन जुबली’ वर्षाच्या पार्श्वभूमीवर दीक्षांत सोहळा वसंत कुंज येथील ‘ऑल इंडिया काउंसिल ऑफ टेक्निकल एजुकेशन’ (एआईसीटीई) ऑडिटोरियममध्ये ठेवण्यात आला. जागेच्या कमतरतेमुळे हा सोहळा विद्यापीठ सोडून अन्यत्र ठेवण्यात आला, असे विद्यापीठाने म्हटले आहे. या सोहळ्यात जवळपास 460 विद्यार्थ्यांना पीएचडीची डीग्री देण्यात येणार आहे.
























































