अमरनाथ यात्रेपूर्वी चकमक; यात्रेच्या मार्गाजवळ सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये कुलगाममध्ये सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गापासून जवळच या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवादी लश्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधी या मार्गावर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची चकमक उडाली.

कुलगामच्या पाती आखरन मीरबाजारजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाला दोन कंठस्नान घालण्यात यश आले आहे. चकमक झालेले ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. याच मार्गाने अमरनाथ यात्रेतील भाविक प्रवास करणार आहेत.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा झाली नव्हती. दोन वर्षांनंतर ही यात्रआ होत आहे. उपराज्यापाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी सकाळी अमरनाथ यात्रेचा पहिल्या जत्थाल्या रवाना केले. पहिल्या जत्थात 4,890 भाविक आहेत.

दोन वर्षांनंतर यात्रा होत असल्याने दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या मार्गावर सुरक्षा दलाच्या 400 पेक्षा जास्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होत असून 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी 3लाखपेक्षा जास्त भाविकांनी नोंदणी केली आहे.