मुलाचा सार्थ अभिमान वाटतो! ‘शेरशाह’ पाहून कॅप्टन विक्रम बत्रा यांचे कुटुंबीय भावुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारगील युद्धात शहीद झालेल्या पॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपट आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. गेल्या 4-5 वर्षांपासून या प्रोजेक्टचे काम सुरू होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने पॅप्टन बत्रा यांची भूमिका साकारली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवी दिल्ली येथे शहीद विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांसाठी तसेच लष्करी अधिकाऱयांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले. पडद्यावर विक्रम यांना बघून त्यांचे कुटुंबीय भावूक झाले. वडील गिरीधारी लाल बत्रा आणि आई कमलकांता बत्रा, भाऊ विशाल बत्रा यांनी साश्रूपूर्ण नयनांनी विक्रम यांचे शौर्य मोठय़ा पडद्यावर बघितले. आईवडिलांनी आपल्या मुलाचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. तसेच सिद्धार्थला पाहताना त्यांना विक्रम यांची आठवण झाली, असेही ते म्हणाले. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या अभिनयाचे त्यांनी काwतुक केले. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

1999 सालच्या कारगील युद्धात पॅप्टन विक्रम बत्रा यांनी प्राणाचे बलिदान दिले. शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणाऱया लढवय्या अधिकाऱयाची कहाणी ‘शेरशाह’मध्ये आहे. चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियारा यांच्या केमिस्ट्रीचे प्रेक्षकांकडून काwतुक होत आहे. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.