ठाणेकर बॅडमिंटनपटूंची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचे विघ्नेश देवळेकर आणि दीप रांभिया यांची दुहेरीत सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून हैदराबाद येथील राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवली आहेत. राष्ट्रीय शिबिरात हिंदुस्थानचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि कोरियन व इंडोनेशियन प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहेत. विघ्नेश देवळेकर हा 2019चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू आहे. या दोघांना अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड, मयूर घाटणेकर आणि अक्षय देवलकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.