
मालाड पोलिसांच्या ‘निर्भया’ पथकाच्या माध्यमातून 200 महिला आणि विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात आले. सेल्फ डिफेन्स शिबिराचा फायदा भविष्यात महिला आणि विद्यार्थिनींना होणार आहे.
मालाड पोलीस ठाण्याच्या ‘निर्भया’ पथकाच्या वतीने बुधवारी महिला आणि विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात आले. निधीवन लॉन्जमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात एसएनडीटी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि मालाड परिसरातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सेल्फ डिफेन्स तज्ज्ञ राम कोटप यांच्या पथकाने महिलांना काही धडे दिले. चावी, ओढणी, मफलर, बॅग, पेन-पेन्सिलच्या मदतीने आपली सुरक्षा कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ, झोन-11 चे उपायुक्त विशाल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे आदी उपस्थित होते.































































