सेल्फीचा अतिरेक म्हणजे स्वप्रेमाचा घातक आजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लंडन

स्वतःचे सतत सेल्फी काढून विविध सोशल मीडियावर अपलोड करणे हे ‘नार्सिसिझम’ या आजारपणाचे लक्षण आहे. यूकेतील स्वानसी विद्यापीठ आणि इटलीतील मिलान विद्यापीठातील संशोधकांनी ‘सोशल मीडियाचे उपयोग’ यावर संशोधन केले. त्यावेळी सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये या ‘नार्सिसिझम’ या आजारपणाशी मिळतीजुळती लक्षणे सापडली.

  • सोशल मीडियाचा वापर करणाऱया 18 ते 34 वयोगटातील 74 व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला.
  • ट्विटर, फेसबुक, इण्टाग्राम आणि स्नॅपचॅटचा वापर करणाऱयांचा यात समावेश होता. फेसबुकचा वापर 60 टक्के, 25 टक्के इण्टाग्राम तर ट्विटर आणि स्नॅपचॅटचा 13 टक्के युजर्सने वापर केला.
  • ओपन सायकोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले.

नार्सिसिस्टिक व्यक्तींची लक्षणे

  • सोशल मीडियावर दृश्य माध्यमाचा (व्हिज्युअल पोस्टिंग) करणाऱयांमध्ये नार्सिसिझमचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या युजर्समध्ये नार्सिसिस्टिक पर्सनॉलिटी डिसऑडरची लक्षणे आढळली.
  • ‘ट्विटर’च्या माध्यमातून फक्त शाब्दिक संदेश पाठवणाऱयांमध्ये  ही लक्षणे आढळली नाहीत.
  • नार्सिसिस्टिक झालेल्या व्यक्ती शब्दांचा वापर कमी करताना दिसतात.
  • प्रत्येकाला सोशल मीडियावर कामाबरोबर संवादासाठी तीन तास देण्यात आले होते. मात्र, यातील यातील बहुतांश जण कामाशिवायही 8 तास शोसल मीडियावर रेंगाळताना दिसले.

स्वतःच्या प्रेमात पडलेल्यांची गोष्ट

नार्सिसिझम म्हणजे स्वमग्नता. स्वतःच्या प्रेमात पडलेल्या  व्यक्ती. अशा व्यक्ती स्वतःच्या दिसण्याचे प्रदर्शन मांडतात, स्वतःचे दिसणे, व्यक्तिमत्त्व यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व नाही असे समजून इतर माझ्यासमोर काहीच नाही असे समजणाऱया व्यक्ती. आत्मप्रेमापोटी अशा व्यक्ती स्वतःचा आणि इतरांचाही घात करू शकतात.