जेष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

मराठी साहित्यात ज्यांचं आदरानं नाव घेतले जाते असे आबासाहेब वाघमारे यांच्या अमृत महोत्सवी वर्षा प्रित्यर्थ परळीत ‘गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राजकीय व साहित्य क्षेत्रातील दिग्गज,शिक्षक,आबांचे विद्यार्थी व सर्वस्तरीय मंडळींची मांदियाळी जमणार आहे. शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे रविवारी सायंकाळी 6 वाजता गौरवसोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र  विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव आबा देशमुख भूषविणार आहेत पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक फ.म.शहाजिंदे, नगराध्यक्षा सरोजनी हालगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी साहित्यिक व शिक्षण  क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वस्तरीय नागरिक उपस्थीत राहणार आहेत.

हा सोहळा सर्वसमावेशक, गौरवी व शानदार व्हावा या दृष्टीने समितीने गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले आहेत. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.