
मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्सने उच्चांक गाठला. दुपारी बाजार बंद होत असतानाच सेन्सेक्सने 58289.61पर्यंत मजल मारली. निफ्टीनेही विक्रमी कामगिरी करत पहिल्यांदाच 17400 अंकांचा टप्पा पार केला.
सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्सने 385.90 पर्यंत उसळी घेत 58515चा उच्चांकी टप्पा गाठला होता. काही वेळाने तो खाली येऊन स्थिरावला पण बाजार बंद होत असताना पुन्हा उसळी घेतली. साडेबाराच्या सुमारास 159.66 अंकांनी तो वधारला. निफ्टीही 105.95 अंकांनी वधारला.
रिलायन्स, बजाज ऑटो, एचसीएल, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एचयूएल या कंपन्यांच्या शेअर्सनी चांगली कमाई केली तर टाटा स्टील, सन फार्मा, एशियन पेण्टस्, पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या शेअर्सना नुकसान सहन करावे लागले.
































































