सात सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱयांच्या बदल्या सुरू केल्या असून आज राज्य सरकारने सात सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. त्यानुसार पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली सहकार आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. राव यांच्या जागी म्हणजे पुणे विभागीय आयुक्त म्हणून चंद्रकांत पुलपुंडवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांची बदली साखर आयुक्त म्हणून झाली आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची नेमणूक हाफकीन बायोफार्मा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे, तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.के. खिल्लारी यांची संचालक, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, पुणे येथे बदली झाली आहे. धाराशीव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची नेमणूक सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे. चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगननाथम एम यांची बदली गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर यवतमाळ जिह्यातील सहाय्यक जिल्हाधिकारी यशनी नागराजन यांची बदली सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.