अरुणाचलमध्ये हिमस्खलनात सात जवान बेपत्ता; कामेंग प्रांतात पेट्रोलिंग करताना मोठी दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशच्या कामेंग प्रांतातील पर्वतरांगामध्ये रविवारी हिमस्खलनाची मोठी दुर्घटना घडून त्यात लष्कराचे 7 जवान अडकले आहेत. या जवानांना वाचवण्यासाठी लष्कराने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवले आहे. मात्र 24 तासांनंतरही एकाही जवानाचा थांगपत्ता लागला नसल्यामुळे लष्कराची चिंता वाढली आहे. या जवानांची पेट्रोलिंग टीम कामेंग प्रांतात गस्त घालत होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.

2019च्या हिमस्खलनात 17 जवान झाले शहीद

तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या विविध दुर्घटनांमध्ये एकूण 17 जवान शहीद झाले होते. सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 6 जवानांचा मृत्यू झाला होता, तर इतर ठिकाणच्या दुर्घटनांत 11 जवान शहीद झाले होते. पेंद्र सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये संसदेत ही माहिती दिली होती. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूल परिसरातील हिमस्खलनात नौदलाच्या 5 जवानांनी प्राण गमावला होता.