मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबल्याने 7 जणांचा मृत्यू; एक जखमी

मुसळधार पावसामुळे घराती भिंत कोसळून आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू झाला. एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.

दिल्लीच्या जैतपूर परिसरात शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. घटना घडताच स्थानिकांनी धाव घेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले. सर्व गंभीर जखमींना सफदरजंग आणि एम्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 वर्ष आणि 7 वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे.