कोठला झोपडपट्टीतील जुगार अड्ड्यावर छापा, सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

सह्याद्रीकोठला झोपडपट्टीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांना रंगेहाथ पकडून सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

जुगार खेळताना सहा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एकूण 1 लाख 20 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध मुंबई कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी गणेश कानडे हा फरार आहे.