
ताडदेवजवळील भाटीया रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या कमला नावाच्या 20 मजली इमारतीला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी या इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
#UPDATE | Seven people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
— ANI (@ANI) January 22, 2022
नाना चौकात असलेल्या कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू असून आणखी काही लोकं अडकल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra | A level 3 fire broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo. 13 fire engines are present at the spot; more details awaited.
— ANI (@ANI) January 22, 2022
#UPDATE | Two people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) January 22, 2022
दरम्यान या इमारतीच्या शेजारी असलेल्या भाटीया रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असेलेल्या सहा वृद्ध रुग्णंना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
Six old age people needed oxygen support system and have been shifted to the hospital. Fire flame is under control but smoke is huge. All people have been rescued: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/PFzDDsDTyW
— ANI (@ANI) January 22, 2022

































































