पार्सल आल्याचे सांगितलं…नंतर बंदुकीच्या धाकाने तरुणावर केला अनैसर्गिक अत्याचार

कानपुरातील पाटणा येथे एक धक्कादायक बातमी घडली आहे. पार्सल देण्याच्या बहाण्याने आणि पिस्तुलाच्या धाकाने एका तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याचा विवस्त्र व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

ही घटना 29 डिसेंबरची आहे. कृष्णापुरी येथील एका हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याच्यासाठी पार्सल असल्याचे सांगितले. तो जसा ते पार्सल घ्यायला खाली आला. दबा धरुन बसलेल्या चार आरोपींनी त्याला पकडून बंदूकीच्या धाकावर गाडीत बसवले. पुरी येथील एका अपार्टमेण्टमधील गच्चीवर नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याने विरोध केल्यानंतर त्याला प्रचंड मारहाण केली आणि त्याचे कपडे उतरवून त्याचा विवस्त्र व्हिडीओ बनवला. शिवाय त्याच्याकडील चेन, ब्लूटूथ आणि 5 हजार रुपये दे नाहीतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलाची वैद्यकीय चाचणी केली. आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरु आहे. या घटनेने विद्यार्थ्यासह त्याचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे.