शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण : फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर, उच्च न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचं नाही असं निरिक्षण यावेळी न्यायालाने नमूद केलं. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने 4 डिसेंबर 2014 रोजी शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. दरम्यान गुरुवारी निर्णय सुनावताना न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला आहे.

देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे विजय जाधव, मोहम्मद बेंगाली, मोहम्मद अंसारी आहेत.