सलमान खानला मारण्यासाठी घेतली होती 30 लाखांची सुपारी

2546

उत्तर प्रदेशमध्ये कंकरखेडा भागात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला कुख्यात गुंड शक्ती नायडूने अभिनेता सलमान खान याची हत्या घडवण्यासाठी 30 लाखांची सुपारी घेतली होती असा धक्कादायक खुलासा नायडू टोळीतील शूटरने केला आहे.

गेल्या मंगळवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत नायडू ठार झाला तर त्याचा एक शूटर पळून जाण्यात यशस्वी झाला होता, मात्र पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. चौकशीत राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरा याने 2018 मध्ये अभिनेता सलमान खान याला ठार मारण्यासाठी नायडूला 30 लाखांची सुपारी दिल्याचे सांगितले, मात्र संपत नेहराला हैदराबाद पोलिसांनी अटक केली असून सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. त्याचबरोबर नायडूने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयात घुसून 8 कोटी लुटल्याचे त्याने कबूल केले.

– नायडू त्याच्या टोळीसह मंगळवारी मेरठमध्ये एका पोलीस अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यासाठी आला असताना पोलीस चकमकीत त्याचा खात्मा झाला. नायडूला दिल्लीचे पोलीस अधीक्षक ललित मोहन नेगी यांचीही हत्या करायची होती, मात्र त्याआधीच त्याचा खेळ खल्लास झाला. चकमकीवेळी पळालेला रवी मलिक ऊर्फ भुरा याला पोलिसांनी दिल्लीतल्या जीवन पार्क परिसरात कारवाई करून अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या