शकुंतला देवी 31 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री विद्या बालनचा बहुचर्चित शकुंतला देवी या बायोपिकचा प्रिमियर थेट अमेझॉन प्राइम व्हिडीयोवर होणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या डिजिटल प्रिमियरची तारीख जाहीर झाली असून 31 जुलैपासून हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येईल.

या बायोपिकमध्ये विद्याने ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱया शकुंतला देवीची भूमिका साकारली आहे. त्या प्रसिद्ध गणिततज्ञ होत्या. यात दंगल फेम सन्या मल्होत्रा विद्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. शकुंतला देवीचे तिच्या मुलीसोबत जटिल पण असाधारण नाते होते. तेही चित्रपटात पाहायला मिळेल. जीशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या