महादेवन पिता-पुत्राच्या जुगलबंदीने चाहते खूश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गायक- संगीतकार शंकर महादेवन यांनी मुलगा शिवम याच्यासोबतचा एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये पितापुत्राची शानदार जुगलबंदी बघायला मिळत आहे. हा व्हिडियो चाहत्यांना खूप आवडत आहे. व्हिडियोमध्ये शंकर महादेवन हार्मोनियम वाजवत आहेत. त्यांच्या शेजारी बसून शिवम सूर आळवत आहे. दोघे ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमातील ‘मेरा यार’ आणि ‘टू स्टेटस’ सिनेमातील ‘मस्त मगन’ ही गाणी गात आहेत. सोशल मीडियावर या व्हिडियोला लाखाहून अधिक क्ह्यूज मिळाले आहेत. चाहते मोठय़ा प्रमाणात कमेंट करून काwतुक करत आहेत.