…म्हणूनच मोदी चार वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर : पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

भाजपने गेल्या पाच वर्षांत विकासाच्या मुद्दय़ावर  निवडणूक लढवली होती. त्यानुसार लोकांनीही त्यांना संधी दिली, पण पाच वर्षांत त्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळेच देशात आणि राज्यात जनता सत्ता बदलण्याच्या मानसिकतेत आहे. आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धसका घेतला आहे. त्यामुळेच त्यांना चार-चार वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर यावे लागत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यानुसार आज त्यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.