
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र अवघ्या सात दिवसांत त्यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनी स्वतःच ट्विट करून आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे. शरद पवार यांना 24 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी चाचणी केली होती.
ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज शरद पवार यांनी कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्विट केली. ते म्हणाले, आजच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. माझी तब्येतदेखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी बरा होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. माझे सर्व सहकारी, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले.






























































