राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे साईचरणी नतमस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आजपासून दोन दिवसीय शिबीर शिर्डीमध्ये होत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.