असंघटित कामगारांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ; शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन

640
sharad-pawar-new

राज्यातील पाच कोटीपेक्षा जास्त असंघिटत कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीला दिले. संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

राज्यातील असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ ,बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य ,घर कामगारांची नोंदणी व त्यांच्या योजना ,यंत्रमाग-ऊसतोड कामगार- रिक्षाचालक व फेरीवाल्यांसाठी मंडळाची स्थापना, स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी, कामगार विषयक त्रिपक्षीय समित्यांची स्थापना, केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरणांवर चर्चा झाली. यावेळी कृती समितीच्या वतीने डॉ. डी एल कराड, विश्वास उटगी, संजय वढावकर, एम ए पाटील आदींनी कामगारांच्या समस्या मांडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या