
दोन दिवस लागोपाठ वाढीनंतर गुरुवारी शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्समध्ये आज 1045 अंकांची घसरण होऊन बाजार 71,593 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 371 अंकांनी घसरण होऊन 22,231 अंकांवर स्थिरावला. रेपो रेट आणि महागाईच्या प्रचंड वाढीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. हिंदुस्थानी शेअर बाजारात 7 ऑक्टोबरला बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 472 लाख कोटी रुपये होते. गुरुवारी हे बाजारमूल्य 11 लाख कोटींनी घसरून 461 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 11 लाख 30 हजार 785 कोटी रुपयांची घसरण झाली. सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांपैकी केवळ 3 शेअर्सच्या किमती वाढल्या. तर 27 कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण झाली.



























































