शेअर बाजारात दिवाळी सुरूच, निर्देशांकात 340 अंकांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market

दिवाळीनंतर शेअर बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. शेअर बाजारात निर्देशांकाने बुधवारी 40 हजारांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर गुरुवारीही बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. आज बाजार सुरू होताच निर्देशांक  263.69 अंकांनी वाढून तो 40 हजार 344 अंकावर पोहोचला.

त्यानंतर दिवसभरात निर्देशाकांत 340 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा  निर्देशांक निफ्टीमध्ये 71.85 अंकाची वाढ होऊन 11 हजार 915 अंकावर पोचला. यावेळी मुंबईतील शेअर बाजारातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सनफार्मा, टाटा मोटर्स या कंपन्या समभाग 4.35 टक्के नफ्यात होत्या, तर टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा कंपन्यांचे शेअर 1.09 टक्के तोट्यात होते.

लाभांश वितरण कर (डीडीटी) संपवणं, कंपन्यांची चांगली कामगिरी आणि अमेरिका- चीनमध्ये भडकलेल्या व्यापार युद्धातून काहीसा दिलासा मिळाल्याने जगभरासह हिंदुस्थानच्या शेअर बाजारात तेजीचे वातावरण दिसत आहे.