शेअर बाजारात घसरण सुरुच; बीएसई 550 अंक खाली, निफ्टीही 11 हजारच्या खाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसत आहे. बुधवारीही शेअर बाजारात घसरण कायम होती. बुधवारी बाजाराचे कामकाज संपले तेव्हा मुंबई शेअर बाजाराच निर्देशांक 550.51 अंकांनी घसरून 35,975.63 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 150.05 अकांची घसरण होऊन तो 10,858.25 वर बंद झाला.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा (6.80%), टीसीएस (4.35%), अॅक्सिस बैंक (3.86%), मारुती (3.31%), आईसीआईसीआई बँक (2.99%), भारती एयरटेल (2.65%), एशियन पेंट (2.63%) आणि रिलायन्स (2.56%) या कंपन्यांच्या शेअरने बीएसईमध्ये आपटी खाल्ली. तर निफ्टीमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा (7.03%), आयशर मोटर्स (6.79%), इन्फ्राटेल (6.45%), टीसीएस (4.38%) आणि अॅक्सिस बँक (3.62%) यांच्या शेअरचे भाव गडगडले.

अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंधामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर होत आहे. त्यामुळे गुतंवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. बुधवारी रुपयाने 73.34 च्या नीचांक गाठला. तसेच आतंरराष्ट्रीय बाजारही मंदीत असल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. निफ्टीच्या निर्देशांकात सर्व सेक्टरमध्ये घसरणीचा लाल रंग दिसत होता. त्यावरून बाजारातील घसरणीचा अंदाज येतो.