कॅटरिनावर ऑस्ट्रेलियात शार्कचा हल्ला, मनगट तुटता तुटता वाचलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कॅनबेरा

कॅटरिना निळ्याशार समुद्रात पोहत असताना शार्कच्या मोठ्या झुंडीने तिला घेरलं. यातील एका शार्कने तिचं मनगट चावलं असून ते तुटता तुटता वाचल्याचं सांगण्यात येत आहे.

या शार्क हल्ल्याचे फोटो काढण्यात कॅटरिनाच्या कुटुंबीयांना यश आल्याने हा सगळा प्रकार फोटोंसकट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

shark-attack-on-katrina

१९ वर्षांची मॉडेल कॅटरिना जाटरुस्की ही तिच्या कुटुंबीयांसोबत सुट्टीवर असून तिला शार्कसोबत फोटो काढायची जाम हौस आली होती.नर्स शार्क मोठ्या प्रमाणावर असलेल्या भागात तिने पोहायला सुरुवात केली. ती समुद्रात उतरताच किमान १५ ते २० शार्क तिच्या अवतीभोवती जमा झाले. यातील एका शार्कने तिच्या मनगटाला चावलं आणि तिला पाण्यात ओढायला लागला.

katrina-injured-in-shark-at

सुदैवाने पाण्यात ओढताच शार्कने तिचं मनगट सोडलं ज्यामुळे ती पाण्याबाहेर येऊ शकली. जर त्यावेळी कॅटरिना किंवा तिचे कुटुंबीय ओरडले असते तर शार्कने पुन्हा तिच्यावर हल्ला केला असता, ज्यात तिचा जीवही जाऊ शकला असता.