‘स्वाभिमानी’च्या उपाध्यक्षा शर्मिला येवले यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षा कु. शर्मीला येवले यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवबंधन बांधून त्यांनी भगवा हाती घेतला. यावेळी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्हे, मंत्री एकनाथ शिंदे, सचिव मिलींद नार्वेकर, खासदार अनिल देसाई, वरुण सरदेसाई, आमदार नरेंद्र दराडे, युवा सेना जळगाव विस्तारक कुणाल दराडे उपस्थित होते.

शर्मिला येवले यांच्यासह कांचन मेंगाळ (पुणे), सुजित केंगार (कोल्हापूर), निखील काळे (सिन्नर), प्रशांत बंदपट्टे, ओंकार कुलकर्णी (पंढरपूर), सुभाष येवले (अकोले),लक्ष्मण नवले (अकोले), बाळासाहेब मालुंजकर (रूंभोडी), गोरक्ष रोहम (अकोले), गोरख शिंदे, संतोष तळेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.