दिग्दर्शक शेखर कपूर यांनी साधला मनमोहन सिंहांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आज ट्विटरवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांवर निशाणा साधला आहे. मनमोहन सिंहांच्या कठोर निर्णय न घेण्याच्या क्षमतेवर त्यांनी टीका केली आहे.

शेखर कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मनमोहन सिंहावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला असल्याचे बोलले जात आहे. ‘जेव्हा मनमोहन सिंहांना विचारले गेले की का ते कठोर नियम घेण्यास असमर्थ ठरतात. त्यावर त्यांनी आघाडीचे राजकारण हे त्यामागचे कारण आहे. लोकशाही ही सुदृढ व चांगल्या विरोधकांमुळे मजबूत होते. तर कमजोर आघाड्यांमुळे लोकशाही कमकुवत होते. देशाला सध्या कणखर केंद्र सरकारची गरज आहे’, असे ट्विट शेखर कपूर यांनी केले आहे.