माजी भाजप आमदाराच्या घरी झाली एसीची चोरी अन् रंगले राजकारण; जाणून घ्या रंगतदार चर्चा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकारणात टीका, प्रतिटीका, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र, हे सर्व फक्त निवडणुकीपुरते असते. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे जनतेसाठी काम करणे लोकशाहीत अपेक्षित असते. मात्र, आता मध्य प्रदेशमध्ये माजी भाजप आमदाराच्या घरी चोरी झाली. चोराने आमदाराच्या घराबाहेरील एसीचे युनीट चोरून नेले. या एसी चोरीवरून मध्य प्रदेशात राजकारण रंगले आहे.

मध्य प्रदेशातील शेवपूर येथील काँग्रेस आमदार बाबू जंदेल यांनी भाजप नेत्याच्या घरी झालेल्या चोरीबद्दल आश्चर्यकारक विधान केले आहे. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी, माजी भाजप आमदार दुर्गालाल विजय यांच्या घरी झालेल्या चोरीमुळे त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर भाष्य केलेआहे. चोराला शोधून बक्षीस देणार असल्याचे जाहीर करत त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करत जंदेल यांनी चोराचे आभार मानले आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील भाजपचे माजी आमदार दुर्गालाल विजय यांच्या घरी चोरी झाली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोराने घराबाहेरील एसी युनिट चोरले. चोरीची माहिती मिळताच, काँग्रेस आमदार बाबू जंदेल यांनी कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करत उपरोधिक टीका केली. मात्र, त्यातील विधानाने राजकारणातील वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी भाजप नेत्याच्या घरातून चोरी करणाऱ्या चोराचे आभार मानले. शिवाय ते चोराला शोधून बक्षीस देतील, असेही त्यांनी जाहीर केले. त्यांचे हे विधान सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.