आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकापच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची उरण येथे सभा झाली होती. यावेळी शेकापचे माजी पूर्व विभाग चिटणीस आणि जिल्हा कमिटी सदस्य मनोज पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. मनोज पाटील यांनी शिक्षक आणि तालुक्यातील विविध आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.

जे.के. म्हात्रे, एन.जी. पाटील, प्रवीण पाटील, किरण भारत पाटील, धनाजी म.पाटील, अमृत ठाकूर, विवेक घरत, शिवं पाटील, आदित्य गावंड, स्वराज तोटे, संदिप राम, अक्षय उंडालकर, आयुष रोकडे, अविनाश प्रसाद, पिंटू नोडी, समीर तोटे, शुभम गिरी, अन्सारी रझ्झाक, कार्तिकी बोबाले, अजय वर्मा, शिवं सोनी, संदिप धेरे, रोहित साळुंखे, ऋषी पाटील, अमरजित राम, राहुल पाटील, प्रसाद तुंबडे, अरविंद पाटील, महेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी शिवसेनचे जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि भोईर शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल जिल्हा प्रमुख शिरिष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, भाजपाचे शहराध्यक्ष कौशिक शहा, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना-भाजपा-रासप- युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.