शीळ-देसाई रस्त्यावरील वाहतूककोंडी फुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीळ – देसाई रस्त्यावरील वाहतूककोंडी लवकरच फुटणार असून तेथे साडेतीन किलोमीटरचा पर्यायी जोडरस्ता होणार आहे. त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर झाले असून या पर्यायी जोड रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. हा समांतर रस्ता काँक्रीटचा होणार असून लवकरच कामालाही प्रारंभ होणार आहे.

कल्याण-शीळ-तळोजा मेट्रोदेखील मंजूर झाली असून त्याचा लाखो रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे. शीळ भागातील वाहतूककोंडीमुळे आसपासच्या नागरिकांनादेखील प्रचंड त्रास होत होता. आता समांतर रस्ता मिळणार असल्याने हा त्रास दूर होणार आहे. विशेषतः नवी मुंबईतून वगळण्यात आलेल्या 14 गावांची सोय होईल. हा समांतर रस्ता दहिसर ते तळोजा एमआयडीसी रस्त्याला जोडला जाणार असून वेळेचीदेखील बचत होणार आहे.

शिवसेनेचा पाठपुरावा
दहिसर ते तळोजा एमआयडीसी समांतर रस्ता व्हावा यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून जोडरस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.